महिलांना एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी,अर्थात - एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या ५ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत, न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या आधारे प्रवेश प्रक्रिया होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.