नांदेड शहरात जन आशिर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाची जन आशिर्वाद यात्रा आज नांदेड शहरात पोहचली. स्थानिक नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. यात्रा शहरात पोचल्यावर कराड यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील हे देखील आज जन आशिर्वाद यात्रेच्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात वरिष्ठ नागरिकांशी भेट घेतील. ते मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांबरोबर संवादही साधणार आहेत.