सातबारा उतारा थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महसूल विभागानं नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीपासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर ही घोषणा केली. हा आधुनिक सातबारा उतारा शेतकऱ्यांना समजण्यास सोपा आणि बिनचूकही आहे. त्याचं हे आधुनिक स्वरूप खातेदारांना माहित व्हावं यासाठी त्यांना खाते उताराची पहिली प्रत घरपोच आणि मोफत दिली जाणार आहे, असं थोरात यांनी सांगितलं. महसूल विभागानं ई पीक पाहणी, संगणकीकृत सातबारा, ऑनलाइन फेरफार, जलद गतीनं जमिनींची मोजणी, सामूहिक गावठाण मोजणी असे अनेक आधुनिक उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात नाविन्यपूर्ण बदल केले आहेत. तो सातबारा उतारा ऑनलाईनही उपलब्ध करून दिला आहे. पुढच्या काळात फेरफार दाखलाही ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. जनतेला अधिक जलद आणि बिनचूक सेवा देताना त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना महसूल यंत्रणेला दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
नगरसेवक नामदेव ढाके यांच्या तहसिल आपल्या दारी मोफत उपक्रमात नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप  
Image
कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
Image
घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन
Image
महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हास्तरीय विविध कार्यालयांना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय
Image
लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन
Image