मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज पहिल्यांदाचं ५४ हजाराचा विक्रमी टप्पा ओंलाडला

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारपेठेतल्या सकारात्मक संकेतामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज पहिल्यांदाचं ५४ हजाराचा टप्पा ओंलाडला. आज सकाळाच्या सत्रात सेन्सेक्स ५४ हजार ३०४ वर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६ हजार २६४ वर सुरु झाला. अर्थतज्ञांच्या मते अर्थव्यवस्था पूर्वपदाला येत असून सुधारित मागणीची पार्श्वभूमी भारतीय निर्देशाकांच्या कामगिरीला हातभार लावत आहे. एफ एम सिजी वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीत चालू आहे.