प्रधानमंत्री विविध देशांमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रमुखांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज विविध देशांमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रमुखांशी तसंच देशातल्या वाणिज्य क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. लोकल गोज ग्लोबल; मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड या संकल्पनेला अनुसरुन आणि भारताची निर्यात, तसंच जागतिक बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.