जम्मू मध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू मध्ये सोपोरच्या पीठसीर भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केलं. घटनास्थळी एक ते दोन दहशतवादी अजूनही लपले असून चकमक सुरूच आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनानं परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. एसओजी, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने काल रात्रीपासून या भागात शोधमोहीम सुरू केली आहे. या दरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दहशतवाद्यांना शस्त्र खाली ठेवण्याची पूर्ण संधी देण्यात आल्याचं म्हटलं आहे.