मूर्तिकारांना मंडप बांधण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं परवानगी दिली जाणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवावेळी मूर्त्या तयार करुन, त्याची विक्री करणाऱ्या मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपातले मंडप बांधण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातून दिली जाणारी परवानगी ऑफलाईन पद्धतीनं दिली जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्यावर्षीही अशाच पद्धतीनं परवानग्या दिल्या गेल्या होत्या. स्वतः मूर्ती तयार करुन विक्री करणाऱ्या मूर्तिकारांनाच ही परवनागी मिळेल, बाहेरुन मूर्त्या आणून, फक्त विक्रीसाठी मंडप बांधायची परवानगी दिली जाणार नाही असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.