ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचे निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं आज पहाटे पेण इथं राहत्या घरी निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. १९७१ मध्ये त्यांचा पहिला काव्य संग्रह इंद्रियोपनिषद हा प्रकाशित झाला. त्यानंतर साक्षात, विलंबित हे काव्यसंग्रह तसेच कविता लेनिनसाठी, नव्या वसाहतीत हे त्यांचे अनुवाद प्रकाशित झाले. महानगरी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रसंगात येणारे उत्कंठ भावनात्मक अनुभव हा त्यांच्या कवितेचा गाभा होता. त्यांना त्यांच्या वाङ्‌मयीन कार्यासाठी सोव्हिएत लँड नेहरू पारितोषिक, लालजी पेंडसे पुरस्कार, बहिणाबाई पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कारासह, विविध पुरस्कार सन्मान प्राप्त झाले होते.  

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image