भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात केला ४१ कोटीचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोविड प्रतिबंधक लसीकरणात ४१ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात कोविड प्रतिबंधक लशीच्या ५२ लाख ६७ हजारापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितले. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या ४१ कोटी १८ लाखाच्या वर गेली आहे