राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा, सर्वोत्तपरी मदतीचे प्रधामंत्र्यांचे आश्वासन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल संध्याकाळी चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसं सुरू आहे, कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली.बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल, असं मोदी यांनी सांगितलं.