कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातली पूरस्थिती नियंत्रणात, मृतांची संख्या २०७ वर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे राज्याच्या मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थती सध्या नियंत्रणात आहे, मात्र चिपळूनणध्ये वाशिष्ठी नदीवरचा मुंबईला जोडणारा पूल कोसळल्यानं वाहतूक अद्यापही ठप्प असल्याचं राज्य सरकारनं कळवलं आहे.
मुसळधार पाऊस आणि पूराशी संबंधित दुर्घटनांमधल्या मृतांची संख्या २०७ पर्यंत वाढली असून ५१ जण जखमी झाले तर ११ जण अजूनही बेपत्ता आहेत. या घटनांमध्ये ३१३ पशू आणि हजारो कोंबड्या आणि पाळीव पक्षांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य सरकारनं दिली. चिपळूण इथं ५ तात्पुरती निवारा केंद्र स्थापन केली आहेत, तसंच पूरग्रस्त जिल्ह्यांमधल्या पावणेचार लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
मदत आणि पुनर्वसनाच्या कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एकूण १८ अठरा पथकं कार्यरत आहेत. यापैकी कोल्हापूरात ८, रत्नागिरी जिल्ह्यात ४, सांगली आणि साताऱ्यात प्रत्येकी २ तर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक कार्यरत आहे. यासोबतच कोल्हापूर, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यात लष्कराचं प्रत्येकी एक पथक कार्यरत असल्याचंही सरकारनं कळवलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.