ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची आज आठवी बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिक्स देशांच्या शिक्षणमंत्र्यांची आठवी बैठक आज दूरदृश्य पद्धतीनं होणार असून केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. यावर्षी भारताद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या तेराव्या ब्रिक्स शिखर बैठकीचा भाग म्हणून ही बैठक घेण्यात येत आहे. पाच ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे शिक्षणमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या बैठकीत उपस्थित असतील. ब्रिक्स नेटवर्क विद्यापीठांच्या आंतरराष्ट्रीय संचालक मंडळाची बैठक गेल्या महिन्यात २९ तारखेला झाली, त्यामध्ये सदस्य राष्ट्रांनी आजवर या पुढाकाराखाली केलेल्या प्रगतीवर एक नजर टाकण्यात आली आणि पुढील वाटचालीवर चर्चा करण्यात आली. ब्रिक्स सदस्य राष्ट्रांदरम्यान शैक्षणिक आणि संशोधनात्मक सहकार्य वाढविण्यासाठी यंत्रणा विकास करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली होती.