देशात गुरुवारी २१ लाख ८० हजार नागरीकांचं लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या २१ लाख ८० हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशभरातल्या २८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आतापर्यंत या वयोगटातल्या ९ कोटी ३८ लाख जणांना लसीची पहिली पहिली मात्रा देण्यात आली आहे. दरम्यान, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ३२ कोटी ९२ लाखांहून अधिक लसी उपलब्ध करुन दिल्या असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. येत्या दोन दिवसात आणखी ९४ लाख ६६ हजारांहून अधिक लसी उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.