देशाचा कोरोना मुक्तीदर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल ४७ हजारापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. आतापर्यंत २ कोटी ९७ लाख ९९ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४३ हजारापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. तर ९३० रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबळींची संख्या ४ लाख ४ हजार २११ झाली आहे. सध्या देशभरात ४ लाख ५९ हजार ९२० रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात काल ३६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. ‌आतापर्यंत ३६ कोटी १३ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image