मुंबईत डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी ‘फाइट द बाईट’ मोहिम सूरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डेंग्यू, मलेरियासारखे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मोहिम राबवली जाते. त्यासाठी इथं निर्जंतुकीकरण करणारा अत्याधुनिक ड्रोन पालिकेच्या वरळी विभागात दाखल झाला आहे. ज्या ठिकाणी पोचणं कठीण असेल अशा वसाहती आणि अडगळीच्या ठिकाणी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे. हा ड्रोन चालवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं असून  ‘फाइट द बाईट’ या प्रकल्पाचा काल प्रारंभ केला असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. मुंबईतले रेल्वे यार्ड, बंद गिरण्या तसंच दाटीवाटीच्या झोपडपट्यांमधे पोचणं पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कठीण जातं, अशा ठिकाणी निर्जंतुकीकरण करणारा अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध केला आहे, असं त्यांनी सांगितलं.