तळई दुर्घटनेत घर गमावलेल्या कुटुंबांना पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात सावित्री नदीच्या प्रवाहाचा जोर कमी झाला असून महाड शहरात घुसलेलं पाणी ओसरलं आहे. तळई इथं दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत घर गमावलेल्यांचं पुनर्वसन करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत त्यांना पक्की घरे बांधून देण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलं आहे. महाड तालुक्यातल्या दुर्घटना ग्रस्त तळई गावाला राणे यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. त्यांच्याबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस, आणि प्रविण दरेकर उपस्थित होते.