राज्यात शनिवारी दिवसभरात ८ लाख ११ हजार ५४२ नागरिकांचं लसीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यानं पुन्हा एकदा विक्रमी कामगिरी केली आहे. शनिवारी दिवसभरात ४ हजार ४०० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ८ लाख ११ हजार ५४२ नागरिकांचं लसीकरण करून नवा उच्चांक नोंदवला. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ३ कोटी ३९ लाख ३२ हजार ८५ मात्रा दिल्या आहेत. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली. ही लक्षणीय कामगिरी असणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलं आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image