राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ साठी दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असं सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं. राज्यात एप्रिल आणि मे २०२१ मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यात आलेल्या अडचणी आणि साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप देय असलेली एफआरपी विचारात घेता, ही मुदतवाढ दिली असल्याचं पाटील म्हणाले. वाढीव मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणारे शेतकरी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र असतील. याबाबतचा शासननिर्णय काल जारी केला आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image