मुख्यमंत्र्यांची तळीये गावाला भेट,दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या दुर्गम तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. या गावात शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सागितले. मदत आणि पुर्नवसन विभागाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार पुरग्रस्त भागातून ९० हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या पूरपरिस्थितीमुळे ७६ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. तर,३० जण बेपत्ता आहेत. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४६ तसेच पोलादपूर तालुक्यातल्या दुर्घटनेत ११ असे एकूण ५७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये १० वर्षाखालील ७ बालकांचा समावेश आहे. पोलादपूर इथला केवणाळे येथे ढिगाऱ्याखाली दबलेले ६ तसेच गोवेले सुतारवाडी इथले ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात आंबेघर इथे आपातकालीन पथक दाखल झाले असून आज सकाळी मातीखाली गाडलेले ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरड कोसळल्याने तसेच मृत झालेल्यांची संख्या आता १४ झाली आहे.