बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चार जण सिवानमधील आणि रोहताश मधील २ जणांचा मृत्यू झाला. पुर्व रेल्वेच्या समस्तीपूर प्रभागाअंतर्गत येणाऱ्या सुगौली आणि मझौलिया स्थानकांदरम्यान असलेल्या बुरही रेल्वे रुळावर पुराचं पाणी आल्यानं ६ विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर १२ मार्गांवरील रेल्वे गाड्या इतर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचं रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी आकाशवाणीला सांगितलं.