महाराष्ट्र चेंबर ऑफ कोमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचं निधन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कोमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचं आज सकाळी नाशिक इथं अल्प आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. ते प्रख्यात कापड व्यापारी होते. नाशिकच नव्हे तर राज्यातल्या व्यापारी वर्गाचं नेतृत्व त्यांनी केलं. ऑल इंडिया रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशनचं अध्यक्षपदहघ त्यांनी भूषवलं होतं राज्यातलो महापालिकांमधली जकात हटविण्यासाठी त्यांनी लढा दिला. नाशिकच्या पंचवटी एज्युकेशन सोसायटीच अध्यक्षपद, तसंच जेसीज सारख्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यही केलं.