महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना
• महेश आनंदा लोंढे
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजनेबाबत अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,इमारत क्र.बी,सनं.१०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे येथे संपर्क साधावा, असे, आवाहन पुणे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक धर्मेंद्र काकडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील जिल्हा करिता २०% बीज भांडवल योजनेचे ५५ व थेट कर्ज योजनेचे २११ भौतिक उदिष्ट प्राप्त झाले आहे. २०% बीज भांडवल योजना ही राष्ट्रीयकृत बँकांमार्फत राबविली जाते. यासाठी प्रकल्प मर्यादा ५ लाख आहे. यात महामंडळाचा हिस्सा २०% व बँकेचा हिस्सा ७५% असून लाभार्थीचा सहभाग ५% आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्ष आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे व संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत असावे. थेट कर्ज योजना महामंडळामार्फत राबिवली जाते. त्याची मर्यादा एक लाख आहे. या योजनेत नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना व्याज आकारले जात नाही. थकित राहिल्यास ४% व्याज आकारले जाते. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्ष आणि सिबील क्रेडीट स्कोर किमान ५०० इतका असावा. संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन १ लाखा पर्यंत असावे. शासनाच्या कौशल्य विकासामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्था मधून तांत्रिक प्रशिक्षण घेतले त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा. जिल्हा कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढीलप्रमाणे पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्र बी, स. नं. १०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी, येरवडा, पुणे-४११००६ फोन- ०२०-२९५२३०५९ हा आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.