ओंजळीतून सांडण्याअगोदर गरजूंना मदत करा : जयमाला इनामदार

 

पडद्यामागिल कलाकारांना ज्येष्ठ कलाकारांचा मदतीचा हात ; नृत्यकला मंदिर आणि लायन्स क्लब व इतर संस्थांचा सामाजिक उपक्रम

पिंपरी : ज्या समाजात, क्षेत्रात राहून आपण धन, संपत्ती कमावतो. ती संपत्ती ओंजळीतून खाली पडून मातीमोल होण्याअगोदर गरजू आणि योग्य माणसांना देऊन सर्वांनी सामाजिक उत्तरदायित्व निभवावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिनेअभिनेत्री जयमाला इनामदार यांनी केले.

कोरोनाशी सामना करीत असताना मार्च 2020 पासून राज्यात अनेकदा लॉकडाऊन झाले. मागील दिड वर्षापासून नाट्यगृह, चित्रपट गृह बंद असल्यामुळे या क्षेत्रांवर अवलंबून असणा-या कलाकारांना, तंत्रज्ञांना, सहाय्यकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटाच्या काळात ज्येष्ठ आणि सुस्थापित कलाकारांनी, समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन गरजू कलाकारांना मदत करण्याच्या उद्देशाने किराणा मालाचे किट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नृत्यकला मंदिर निगडी, लायन्स क्लब (डि. 3234D2), कृष्णकुमार गोयल फाऊंडेशन, अनुप मोरे स्पोर्टस ॲण्ड सोशल फाऊंडेशन आणि अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या वतीने पुणे, नाशिक, नगर मधिल एक हजार कलाकार, तंत्रज्ञ आणि सहाय्यकांना या अंतर्गत मदत करण्यात आली. यातील पहिला कार्यक्रम - चिंचवड मधिल प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, दुसरा कार्यक्रम तळेगाव दाभाडे विठ्ठल मंदिर येथे, तीसरा कार्यक्रम बालगंधर्व, पुणे येथे आणि चौथा व समारोपाचा कार्यक्रम ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे करण्यात आला.

या कार्यक्रमांना पिंपरी चिंचवडच्या माजी उपमहापौर व नगरसेविका शैलेजा मोरे, माजी प्रांतपाल सी ए लायन अभय शास्त्री, प्रतिभा इंटरनॅशनल विद्यालयाचे संस्थापक लायन दीपकभाई शाह, नवनिर्वाचित प्रांतपाल लायन हेमंत नाईक, लायन प्रमिला वाळुंज, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्यक्रमाच्या संयोजिका व नृत्यकला मंदिरच्या संस्थापिका तेजश्री अडिगे, अनुप मोरे यांच्या हस्ते किटवाटप करण्यात आले. अभिनेता विजय पटवर्धन आणि डॉ. संजीवकुमार पाटील, अभिनेत्री सायली राजहंस, संचालिका शोभा कुलकर्णी, लावणी नृत्यांगना सुजाता कुंभार, जेष्ठ लोकनाट्य कलाकार वसंत अवसरिकर, लायन अजित देशपांडे, प्रशांत कुलकर्णी, वसंत देशपांडे, विभाग अधिकारी दीपा जाधव, सुनील जाधव, लायन्स प्रांताच्या सेक्रेटरी सुनिता चिटणीस, प्रकल्प अधिकारी काश्मीर नागपाल, बलविंदार सिंग राणा, सचिन वाघोडे, सूप्रिया धाईंजे आदी उपस्थित होते.

बालगंधर्व परिवाराचे उपाध्यक्ष योगेश देशमुख यांनी गरजू कलाकाराना संपर्क करण्याचे काम पाहिले. या उपक्रमास लायन्स क्लब ऑफ तळेगाव, लायन्स क्लब पुना निगडी, लायन्स क्लब मेट्रोपॉलिस, लायन्स क्लब पुणे सिनियारस, लायन्स क्लब पुना पिंपरी चिंचवड, लायन्स क्लब पुना कोथरूड, लायन्स क्लब पुना गणेशखिंड, लायन्स क्लब पुणे पिंपरी गोल्ड या संस्थांनी देखिल सहाय्य केले.

Popular posts
लाल समुद्र आणि एडनच्या आखातातल्या जहाजांवरचे हल्ले थांबवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं हौती दहशतवाद्यांना आवाहन
Image
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
Image
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय आता ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ म्हणून ओळखले जाणार
Image
राज्यातील विविध जिल्ह्यांत परतीच्या पावसाची हजेरी
Image
अर्जेंटिनाविरुद्ध हॉकीच्या चौथ्या सराव सामन्यात भारताचा विजय
Image