राज्य विधीमंडळाचं उद्यापासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्या सर्व आमदारांना आरटीपीसीआर कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हँडग्लोज असं साहित्य दिलं जाणार आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.