महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी डॉ.गोविंद हरिबा काळे यांची नियुक्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.गोविंद हरिबा काळे यांची, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनानं नऊ सदस्यीय आयोग गठीत केल्याचं पत्र जारी केलं आहे. यामध्ये डॉ.गोविंद काळे यांची मराठवाडा विभागातून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.काळे विद्यापीठ अधिसभा सदस्य तसंच उस्मानाबाद उपपरिसर मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.