मुंबईतल्या ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत ११ मे पासून स्तनदा मातांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आज सकाळपासून मुंबईतल्या ३५ लसीकरण केंद्रांवर गरोदर मातांच्या लसीकरणाला सुरवात झाल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ‘राष्ट्री य लसीकरण तांत्रिक सल्लाागार गट’ व ‘कोविड - १९’ लसीकरणासाठी असलेला ‘राष्ट्रीय तज्ज्ञ गट’ यांच्याद शिफारशीनुसार भारत सरकारने गरोदर महिलांना ‘कोविड - १९’ लसीकरणात समाविष्टु केलय. मुंबईतल्या लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत सदर लसीचा लाभ घेऊ शकतात. ज्या महिलांना ‘कोविड - १९’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल ऑंटीबोडीज’ किंवा प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना १२ आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल, असंही काकाणी यांनी सांगितलं.