राज्यातल्या बहुतांश भागात पूरस्थिती, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदत आणि बचावकार्य सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई या गावातील घरांवर दरड कोसळली असून त्यात ३२ ते ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील  पुरस्थितीचा आढावा घेतला.

त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.याठिकाणी युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.३२ जणांचे मृतदेह एनडीआरएफ आणि स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत. अजून ३० ते ४० मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. पूर, अंधार आणि रस्त्यावरील अडचणीमुळे रात्री एनडीआरएफला घटना स्थळावर पोहचता आलं नाही. एनडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत.

हेलिकॉप्टरच्या साहाय्याने मदत आणि बचाव कार्य सूरु आहे. मुंबई - गोवा महामार्गावर अनेक वाहनं अडकून पडलेली आहेत. हा महामार्ग आजही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात  साखर सुतार वाडी इथं  दरड कोसळून ४ लोकांचा मृत्यू झाला आहे.तसेच अजून ५ लोक ढिगाऱ्याखाली अडकले असून ४ जण जखमी आहेत. या गावांना जोडणारा पितळवाडी - उमरठ फाटा पूल तसंच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे  बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image