राज्यातल्या गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाचं काम, तसेच जैवविविधतेचे जतन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाच्या कामाचा, तसंच त्या परिसरातल्या पर्यटनासाठी सुविधा निर्मिती, परिसरातल्या जैवविविधतेचं जतन, वनीकरण या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असून समितीमध्ये एकुण २४ सदस्यांचा समावेश आहे. सुकाणू समितीनं घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा आढावा, आणि पाठपुराव्याचं काम मुख्यमंत्री सचिवालयातला संकल्प कक्ष करणार आहे.या योजनेंतर्गत चालू आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड, आणि तोरणा या सहा किल्ल्यांचं सर्वांगिण संवर्धन हाती घेतलं जाईल. गडकिल्ल्यांच्या सर्वागिण विकासासाठी ही समिती अग्रक्रम ठरवेल. निवड केलेल्या किल्ल्यांच जतन आणि संवर्धनाचं काम सांस्कृतिक कार्य विभाग करेल.  या विभागांमार्फत केल्या जात असलेल्या कार्यवाहीचा, ही समिती वेळोवेळी आढावा घेईल.