काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांचा भाजपात प्रवेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी आज भाजपात प्रवेश केला. काँग्रेससोबत मदभेद झाल्यानं गेल्या काही काळापासून ते पक्षातल्या घडामोडी आणि कार्यापासून दूरच होते. त्यानंतर त्यांनी आज राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात अधिकृत प्रवेश केला.