आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज यांचा गुरुवारी पालखी प्रस्थान सोहळा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीसाठी देहूतून संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी आज प्रस्थान करणार आहे. कोरोना प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही कडक निर्बंधांमध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. यंदा प्रस्थानासाठी केवळ १०० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यात मानाच्या ६० दिंड्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

सहभाग घेणाऱ्या या वारकऱ्यांची काल देहूत कोविड चाचणी करण्यात आली, देहूत सध्या संचारबंदी असून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट आहे. दुपारी २ वाजता प्रत्यक्ष प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. दशमीपर्यंत पालखीचा मंदिरातच मुक्काम असणार आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख नितीन महाराज मोरे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली.