राज्यात १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळानं वार्ताहर परिषदेत आज ही माहिती दिली. दहावीच्या निकालात कोकणानं बाजी मारली असून, कोकण विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. यंदा आठ माध्यमांतल्या ९ लाख ९ हजार ९३१ मुले, तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली अशा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर केला आहे.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image