करगिल युद्धातील विजयाच्या २२ व्या स्मृतीदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांद्वारे हुतात्म्यांना अभिवादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज २२ व्या करगील दिवसाच्या स्मृतीप्रीत्यर्थ लदाखमधील द्रास भागातील करगील युद्ध स्मृती स्मारकाला भेट देतील. भारतीय लष्करानं अतुलनीय धैर्य आणि समर्पण भावनेन १९९९ साली करगिलमधील संघर्षाला तोंड दिलं होतं. राष्ट्रपती कोविंद आणि भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत द्रासमध्ये करगिल युद्धातील हुताम्यांना आदरांजली अर्पण करतील. तसंच दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलांचे प्रमुख राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये आदरांजली अर्पण करतील. ऐतिहासिक विजय दिवसाचं औचित्य साधून संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी परिक्रमा कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय सैनिकांच्या शौर्याला अभिवादन करणारा कार्यक्रम आकाशवाणीचा वृत्त सेवा विभाग प्रसारित करणार आहे.