वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

  वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट

मुंबई : वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर वरळी सी फेस म्युनिसिपल शाळेत पोलीस बांधवांच्या परिवारासाठी आयोजित लसीकरण केंद्रासही भेट देऊन पाहणी केली.

कोळी भवन येथे या परिसरातील कोळी बांधवांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले असून वरळी म्युनिसिपल शाळेत पोलिसांच्या कुटुंबियांना व परिसरातील नागरिकांना लस उपलब्ध केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आनंद राठी आणि ‘लिव्ह टू गिव्ह फाऊंडेशन’ आणि सुराना हॉस्पिटलच्या सौजन्याने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये सुमारे पंधराशे जणांचे लसीकरण केले जाणार आहे.

यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, पोलीस उपायुक्त परमजित सिंह दहिया, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image