सीईटीची प्रश्नपत्रिका सर्व बोर्डातल्या विद्यार्थ्यांसाठी समान असावी यादृष्टीनं विविध क्षेत्रातल्या तज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षा, अर्थात सीईटी बंधनकारक करावी, असे निर्देश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. तसंच सीईटीची प्रश्नपत्रिका सर्व बोर्डातल्या विद्यार्थ्यांसाठी समान असावी यादृष्टीनं विविध क्षेत्रातल्या तज्ञांची समिती नेमण्यात यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. ही सीईटी राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. सर्व बोर्डांच्या मागणीनुसार प्रत्येकाच्या अभ्यासक्रमाचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका काढायला गोंधळ निर्माण होईल, असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं.