संतश्री ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या निमंत्रित २२ वारकऱ्यांना कोरोनाची लागण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : संतश्री ज्ञानेश्वर माउलींच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या निमंत्रित वारकऱ्यांपैकी सुमारे २२ जण कोरोना बाधित आढळल्याचं खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आळंदित दाखल झालेल्या निमंत्रित वारकरी आणि अन्य मान्यवरांची कोरोना चाचणी सुरु आहे. समाधी मंदिरातील कर्मचाऱ्यांसह आळंदीच्या नगराध्यक्षांचाही त्यात समावेश आहे. आज माउलींच्या चल पादुकांचा प्रस्थान सोहोळा पार पडत असतानाच कोरोनाचा हा प्रादुर्भाव समाधी मंदिरापर्यंत पोचल्याचं स्पष्ट झालं आहे.m त्यात कोरोनाबाधित आढळलेल्या वारकऱ्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आलं असलं तरी आता त्यांच्या संपर्कात आले. ल्यांचा शोध घेऊन त्यांची पुन्हा चाचणी करण्याच्या दृष्टीनं नवीन आव्हान प्रशासन आणि मंदिर समितीपुढं उभं राहील आहे.