मुंबईतल्या धारावी झोपडपट्टीत कोरोनावर नियंत्रण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर नियंत्रण आले आहे. रोज एक आकडी रुग्णांची नोंद होते आहे. मात्र संपूर्णपणे कोरोना रोखण्यासाठी धारावीत लसीकरणावर भर दिला जाणार आहे. यासाठी महिनाभर लसीकरण विशेष लसीकरण मोहिम राबवली जाणार आहे.  एक लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य आहे. सिटी बँक, जसलोक रुग्णालयाच्या सहाय्यानं सीएसआर फंडातून ही मोहीम राबवली जात आहे. धारावी पालिका शाळेत यासाठी आवश्यक यंत्रणा उभारली असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.