राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यासह मान्यवरांच्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय डॉक्टर दिन. देशाला निरोगी राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९९१ सालापासून हा दिवस पाळला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी.सी. रॉय यांनी वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. भारतीय वैद्यकीय परिषदेची स्थापना करण्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान होतं. त्यांच्या योगदानासाठी १९६१ साली  त्यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोविडकाळात डॉक्टरांनी आपल्या कर्तव्यांच्या पलीकडे जात रुग्णसेवा केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून, निस्वार्थी सेवा देत असलेल्या या देवतदूतांप्रती देश सदैव कृतज्ञ राहिल, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. कोविडकाळात डॉक्टरांनी अहोरात्र सेवा केली, इतरांचा जीव वाचवण्यासाठी ते देत असलेल्या निस्वार्थी सेवेला आपण सलाम करतो, असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे. मोदी यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहे. औषध क्षेत्रात भारतानं कौतुकास्पद प्रगती केली असून, जगाला निरोगी राखण्यात भारतानं मोठं योगदान दिलं असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या मन की बात या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी डॉक्टर दिनानिमीत्त व्यक्त केलेल्या विचारांचा व्हिडिओही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशभरातल्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटापासून देशाला वाचवण्यासाठी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र देत असलेल्या लढ्याबद्दल आपण त्यांना सलाम करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image