केंद्र सरकारकडून, आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना ४२ कोटी १५ लाख लसींचा पुरवठा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने, आतापर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक लसींच्या ४२ कोटी १५ लाख मात्रा पुरवल्याची माहिती आज दिली.

देशात २१ जून पासून राष्ट्रव्यापी लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. याअंतर्गत लशींची उपलब्धता लक्षात घेऊन राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या वितरणाचे योग्य नियोजन करता यावे यादृष्टीने लसींचा आगाऊ पुरवठा केला जात आहे. लसीकरणाला वेग यावा तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठिंबा म्हणून केंद्र सरकार मोफत लसी पुरवत आहे.