माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या घरांवर छापे घातले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात केलेल्या आरोपानंतर देशमुख यांच्या विरोधात चौकशी सुरु आहे. त्याच प्रकरणात संचालनालयानं आज नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यात असलेल्या देशमुख यांच्या वडिलोपार्जित घरावर छापे घातले.