टोकियो पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधवचा भारतीय संघात समावेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा भारतीय संघात समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला दिव्यांग खेळाडू आहे. २०१९ मध्ये चीन इथं झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत, भाग्यश्रीने दोन कांस्य पदकं, तर या वर्षी दुबईत झालेल्या फाजा पॅरा अथेलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धत, गोळाफेक प्रकारात रौप्यपदक, तर भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे