देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६ शतांश टक्क्यावर
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल दिवसभरात देशात ४४ हजार १११ नवे कोरोना बाधित आढळल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण २ पूर्णांक ३५ शतांश टक्के आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ कोटी ५ लाख २ हजार ३६२ असून या पैकी २ कोटी ९६ लाख ५ हजार ७७९ रुग्ण बरे झाले आहेत. काल दिवसभरात ५७ हजार ४७७ रुग्ण बरे झाले. देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९७ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं आहे. काल दिवसभरात ७३८ कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंतच्या मृतांची एकूण संख्या ४ लाख १ हजार ५० झाली असून मृत्यू दर १ पूर्णांक ३१ शतांश टक्के आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.