भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या महिला क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात वॉर्सस्टर इथं काल झालेल्या महिलांच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात, भारतानं इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. विजयासाठी इंग्लंडनं भारतासमोर २२० धावांचं आव्हान ठेवलं होतं. सहा गड्यांच्या मोबदल्यात ३ चेंडू राखून भारतानं हे आव्हान पूर्ण केलं. कर्णधार मिताली राज हिनं ८६ चेंडूत नाबाद ७५ धावा फटकावल्या. यामुळं मिताली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधली सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिनं इंग्लंडची खेळाडू शारलॉट एडवर्डस हिचा१० हजार २७३ धावांचा विक्रम मागे टाकला. ३ सामन्यांच्या या मालिकेतला हा अंतिम सामना होता. भारतानं आधीचे दोन सामने आणि पर्यायानं मालिका आधीच गमावली होती.