प्रधानमंत्र्यांकडुन शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या एका ट्विट संदेशात त्यांनी मंत्र्यांना लोकांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आणि विकसित भारतासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे.