अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी घेतली डॉक्टर एस. जयशंकर यांची भेट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आज भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. भारत अमेरिका संबंध आजवर समाधानकारक राहिले असून आगामी काळातही एकत्र काम करू असा विश्वास ब्लिंकन यांनी या बैठकी दरम्यान व्यक्त केला.