प्रधानमंत्र्यांनी मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेच्या बैठका बोलावल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेबदल केल्यानंतर आज मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषदेच्या बैठका बोलावल्या आहेत. मंत्रिमंडळाची बैठक आज संध्याकाळी पाच वाजता, तर मंत्रिपरिषदेची बैठक त्यानंतर लगेच संध्याकाळी सात वाजता होणार आहे. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात १५ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश केला असून सात राज्य मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळाली आहे. नव्या मंत्रिमंडळात राज्यातल्या नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपील पाटील यांचा समावेश आहे.