देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक जणांचे लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक कोविड लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.जवळजवळ ३९ लाख मात्रा काल विविध राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत.देशात काल १८ लाखापेक्षा जास्त जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर १ लाख ९२ हजारापेक्षा अधिक जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातल्या जवळपास १३ कोटी ५२ लाख जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून ५७ लाख ५४ हजार ९०८ जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात १८ ते ४४ वयोगटातल्या एक कोटीपेक्षा अधिक  नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे.