फिलिपाईन्समध्ये हवाई दलाच्या विमानाला झालेल्या अपघातात ४५ जणांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्सच्या हवाई दलाचं विमान काल देशाच्या दक्षिणेकडील भागात कोसळल्यानं झालेल्या अपघातात ४५ जण मृत्युमुखी पडले तर ५३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने लष्करी कर्मचारी असून जमिनीवर असलेले तीन नागरिकही या अपघातात मरण पावले आहेत. हे लष्करी विमान बंडखोरांविरूद्धच्या कारवाईसाठी चाललं होतं, मात्र या दुर्घटनेत कोणत्याही हल्याची चिन्हं नाहीत असं फिलिपीन्सच्या लष्करी प्रवक्त्यानं सांगितलं आहे.