कोरोना प्रतिबंधक लसींच्या आजवर 39 कोटी 53 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 38 हजार 949 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. कालच्या तुलनेत ही संख्या 3 हजारांनी कमी आहे. या आजारातून 40 हजार 26 जण या कालावधीत बरे झाले. या कालावधीत कोविड-19 मुळे 542 जणांच्या मृत्युची नोंद झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्याही थोडी घटली असून सध्या देशात 4 लाख 30 हजार 422 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 28 शतांश टक्के आहे. कोविड-19 मुळे देशात दगावलेल्यांची एकंदर संख्या 4 लाख 12 हजार 531 झाली आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसींच्या आजवर 39 कोटी 53 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 38 लाख 78 हजारांहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

Popular posts
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
पेटंट, डिझाईन, कॉपीराईट आणि ट्रेडमार्क वितरीत करण्यासाठी केलेल्या सुधारणांबद्दल पियुष गोयल यांच्याकडून समाधान व्यक्त
Image
कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६८ शतांश टक्के
Image