जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणीसाठी विशेष अभियान ; 2 जुलै ते 7 ऑगस्ट गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान

 

पुणे : ग्रामीण भागातील कुटूंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे 55 लिटर दरदिवशी दरडोई पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ठ आहे. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 2 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे.

हा आराखडा राबविण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने नुकतेच रोजी - कार्यकारी अभियंता,उप अभियंता ,शाखा अभियंता,सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार यांना गाव कृती आराखडा मधील माहितीचे संकलन, राबविण्याची प्रक्रिया, कोबो टुलद्वारे माहिती अपलोड याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दुस-या टप्प्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत.), वरिष्ठ भुवैज्ञानिक ,शाखा अभियंता ,मनुष्यबळ विकास सल्लागार ,सनियंत्रण व मुल्यमापन सल्लागार ,पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरिल गटविकास अधिकारी ,उप अभियंता-ग्रापापु, विस्तार अधिकारी (पंचायत) गटसमन्वयक,समुहसमन्वयक यांना झुम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तालुका पातळीवर सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडुन दिनांक- 28 ते 30 जुलै दरम्यान ग्रामपंचायतींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंपऑपरेटर, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना झुम ॲपद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दिनांक 4 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हा स्तरावर सर्व गावांची गाव कृती आराखड्याची माहिती संकलीत होऊन गाव कृती आराखडयाची निर्मिती केली जाईल. दिनांक 5 ते 7 ऑगस्ट 2021 या कालावधीत तालुकास्तरावर आराखड्यांची पडताळणी होवून आवश्यक त्या सुधारणा केल्या जावुन असे आराखडे दिनांक-15 ऑगस्ट 2021 रोजीच्या ग्रामसभेत वाचन व मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.

गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरित्या राबविण्याचे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मिलींद टोणपे व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.सुरेंद्रकुमार कदम यांनी केले.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 22 जुलै ते 7 ऑगस्टदरम्यान गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानात गाव पातळीवरील वैयक्तिक नळ जोडणीसाठी आराखडा तयार होईल. त्यासाठी तालुका व गाव पातळीवरील सर्वांनी सहभाग घ्यावा, असे निर्देश श्री. आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image