ICC-T20 विश्वचषक भारतात घेण्यासंदर्भात २८ जूनपर्यंत निर्णय होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ICC-T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात आयोजित करणं शक्य आहे का अशी विचारणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली आहे.

ICC ची बैठक आज आभासी पद्धतीने झाली. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली आणि कार्यवाह जय शहा त्यात सहभागी झाले होते.

येत्या २८ जूनपर्यंत यावर निर्णय घ्यावा असं सांगून ICC ने बैठकीत स्पष्ट केलं की, सामने कुठेही झाले तरी यजमानपद भारताकडेच राहील.

ICC-T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे.